मुळा मुठा नदीसाठीच्या मलशुद्धीकरण केंद्रांच्या बांधकामाला त्वरित सुरवात करा.
मुळा मुठेच्या स्वच्छता प्रकल्पाचा प्रश्न ५० हुन अधिक वर्षे प्रलंबित आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमधून ह्या प्रकल्पाच्या त्वरित पूर्णत्वाची निकड अनेक वेळा बोलून दाखवली आहे. यासाठी ९९० करोड रुपयांचे कर्ज जानेवारी २०१६ मध्येच मंजूर झाले होते. ह्या प्रकल्पातील ११ मलशुद्धीकरण केंद्रे या प्रकल्पातील प्रमुख घटक आहेत. पण आज चार वर्षे उलटून गेल्यांनतरही पुणे महानगरपालिकेने अजून एकाही मलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम सुरु केलेले नाही.
आजही मोठ्या प्रमाणात सांडपाणी आणि मल मुळा मुठेच्या पाण्यात मिसळत आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केलेल्या संशोधनात नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचा भार पडत असल्याचे लक्षात आले आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार मुळा मुठा नदीच्या पाण्यातील धोकादायक सूक्ष्मजंतू हे कोणत्याही प्रजैविकांनाही (Anti-Biotics) दाद देत नाहीत असे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांवर कोणतेही औषध उपयोगी पडणार नाही. सर्व पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने हि अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावर त्वरित कृती होण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासातील निष्कर्षातून संशोधकांनी मलशुद्धीकरण केंद्राच्या त्वरित उभारणीची निकड जानेवारी २०१८ मध्येच निदर्शनास आणून दिली होती. पण पुणे महानगर पालिका मात्र अजूनही या मुद्द्यावर उदासीन दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेने मलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला प्राधान्य देऊन सर्व ११ मलशुद्धीकरण केंद्रांच्या बांधकामाला त्वरित सुरवात करावी ही आमची मागणी आहे. जास्तीत जास्त संख्येने या पेटिशनला sign करून आमच्या मोहिमेला समर्थन द्या.

पुण्यातील नद्या वाचवा अभियानाला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद.
जितक्या जास्त प्रमाणात हि पेटिशन sign आणि share केली जाईल तितकाच जास्त प्रतिसाद आम्हाला प्रशासनाकडून मिळवता येईल. कृपया खालील बटणांवर क्लिक करून ही पेटिशन आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत share करावी.
-- झटका टीम
आपल्याला आमचे काम आवडते आहे का? आपणास आमच्या मोहिमांना आर्थिक साहाय्य करायची इच्छा आहे का? असल्यास खालील लिंकला भेट जाऊन donation करा.