प्रति,
वृक्ष प्राधिकरण विभाग, पुणे महानगरपालिका.
मागण्या:
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल 2013 च्या आदेशाची अंमलबजावणी करा ज्यात झाडांवरून खिळे, हुक, बोर्ड इत्यादी काढून टाकण्याची शिफारस केली आहे. या आदेशात अधिकाऱ्यांनी झाडांना होणारी हानी टाळण्यासाठी उपाययोजना करावी आणि पर्यायी प्रकाशयोजना/जाहिराती उपाय शोधावेत अशी शिफारस देखील केली आहे.
दिवे, खिळे आणि पोस्टर यांसारख्या गोष्टींचा झाडांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जनजागृती मोहीम राबवावी.
रस्त्यांच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडं ही पुण्याची ओळख आहे. ही झाडं उन्हाळ्यात सावली देतात, प्रदूषण कमी करतात आणि पावसाळ्यात मुसळधार पावसात भिजण्यापासून आपल्याला वाचवतात.
याच झाडांवर आपण मात्र अत्याचार करत आहोत. झाडांवर खिळे ठोकले जातात, पोस्टर चिकटवलेले असतात, काही ठिकाणी बॅनर टांगलेले आढळतात, हे सगळं करताना झाडांची साल किती खराब होते हे आपल्या लक्षात येत नाही, यासगळ्यामुळे झाडाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात आणि हळूहळू झाडं मरायला लागतात.
दुकानदारमंडळी आपल्या दुकानासमोरच्या झाडाचा हवा तसा वापर करतात, त्याला भरमसाठ लाइटिंग करतात मात्र हे महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अंतर्गत बेकायदेशीर आहे. तरीही याबाबतीत पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग डोळे झाकून बसलाय. या लाईट्समुळं झाडांची वाढ खुंटते, त्यांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया देखील विस्कळीत होते.
सणाचे दिवस आले की आपल्याला सगळं सजवावंसं वाटतं, पण त्यासाठी झाडांचा बळी जायला नको. खिळे, पोस्टर, वीजेच्या तारा, लाईट्स आणि बॅनर यांपासून आपली झाडं वाचवूया. नाहीतर पुण्यात पाऊस-ऊन बेभरवशाचं होईल आणि प्रदूषण वाढत जाईल. सजावटीसाठी आणि जाहिरातींसाठी खांब आणि भिंती वापरूया - ते पण योग्य परवानगी घेऊनच!
2013 साली हरित न्यायालयानं झाडांवर खिळे, हुक, बोर्ड अशा गोष्टी लावणं चुकीचं आहे हे स्पष्टपणे सूचित केलं आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत आणि लाईट्स, जाहिराती यांचे दुसरे मार्ग शोधले पाहिजेत. आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला या समस्येची दखल घेण्याचे आवाहन करतो आणि पुण्यातील झाडे सगळी झाडं या त्रासातून मुक्त करावीत अशी विनंती करतो.
संदर्भ: