प्रति,
मा. आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्रात दर १००० लोकसंख्येच्या मागे फक्त ०.८४ डॉक्टर आहे.[1] ग्रामीण भागातील परिस्थिती तर आणखीनच बिकट आहे. भौगोलिक अडचणी, अपुरी आरोग्य सुविधा यांमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
नाशिक, धुळे, नंदुरबार मधील आशाताईंशी बोलल्यावर कळले कि अनेकदा उपकेंद्र कार्यरत नसते आणि रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी गंभीर असते, प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी अँब्युलन्स रस्त्या अभावी वेळेत येत नाहीत, कधी केंद्र दूर असल्यानेही वेळ लागतो, आणि तिथे गेल्यावर कर्मचारी नसतात किंवा कंटाळा करतात अशा उदासीनतेमुळे रुग्णांची रवानगी सरळ जिल्हा रुग्णालयात केली जाते, ज्यामुळे बरेच हाल होतात. जिल्हा रुग्णालय अनेक गावांपासून ८०-९० किमी च्या पुढे असते अशावेळी रुग्ण दगावण्याची भीती जास्त असते. विशेषतः गरोदर महिलांना प्रसूतीसाठी झोळी करून किंवा दुचाकीवर न्यावे लागत आहे.[2]
महाराष्ट्रात १८११ प्राथमिक आरोग्य केंद्र असून १०५८० उपकेंद्र आहेत. ज्यातून गावोगावी आरोग्य शिक्षण आणि औषधोपचार पुरवणे अपेक्षित आहे. दर २० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र अनेक ठिकाणी या यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात १ रुग्णवाहिका उपलब्ध असते. मात्र २० हजार लोकसंख्येसाठी ही व्यवस्था अपुरी आहे.
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेक लोकांचे जीवन धोक्यात आहे. गरोदर स्त्रियांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे गर्भपात, प्रसूतिपूर्व मृत्यू आणि गर्भधारणेतील गुंतागुंत यांसारख्या समस्या निर्माण होतात. दुर्गम भागात माता आणि बालक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
दुर्गम भागातील आरोग्य समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने पुढील उपाय केले पाहिजेत.
सर्व जिल्ह्यातील दुर्गम भागात रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोचवण्यासाठी प्रत्येक उपकेंद्रात २ रुग्णवाहिका मोफत उपलब्ध करून द्याव्या.
दुर्गम भाग म्हणजे cut off area मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी लवकरात लवकर रस्ते बांधणी करावी. व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या भागात झालेल्या कामाचे ऑडिट पावसाळ्यापूर्वी व्हावे.
प्रत्येक ग्रामपंचायतीत ANM आणि आशा सेविका यांच्या देखरेखीखाली प्रसूतीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी.
अत्यावस्थ रुग्णांसाठी राज्यपातळीवर २४ तास तात्काळ आरोग्य हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. जी जवळच्या आरोग्य केंद्रातून तातडीने मदत मिळवून देईल आणि विलंब होणार नाही.
Sources :