Please Wait....

Campaign Partner : Waatavaran

प्रति,
मुंबई महानगरपालिका
मुख्य सचिव - पर्यावरण विभाग, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सार्वजनिक बांधकाम विभाग 

मुंबईच्या हवेतील दोन तृतीयांश पार्टिकल्स हे धूलिकण असतात. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नॅशनल एन्व्हायर्मेंट इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) यांच्या २०२१ च्या अभ्यासानुसार मुंबईच्या पर्टिक्युलेट मॅटर चा ७१% प्रमाण रस्त्यावरच्या धूलिकणांचे आहे. २०१० मध्ये हे प्रमाण २८ % होते. गेल्या दशकभरात झपाट्याने वाढलेल्या उंच इमारती आणि महामार्ग ही वाढलेल्या धुळीची प्रमुख कारणे आहेत.[1]

धुळीचे प्रमाण कमी कारण्यासाठी शहरातील सर्व Construction and Demolition (बांधकाम आणि विनाश) कामांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. 

यात धूळ उठत राहू नये म्हणून पाणी शिंपडणे, जे सहज हवेने उडून जाऊ शकते अशा बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्यावर कव्हर शीटचा (प्लॅस्टिक, ताडपत्री इ.) वापर करणे, तात्पुरत्या काळासाठी मलबा टाकण्याच्या जागा झाकणे, बांधकामे, विशेषतः आजूबाजूचे रहिवासी क्षेत्र यांना पुरेसे कव्हर असणे इत्यादीचा समावेश होतो. हवेची गुणवत्ता सतत खालावत असूनही या मार्गदर्शक सूचनांचे पालन मुंबईत होत नाही. 

यामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक(AQI) घसरला आहे. डिसेंबरमध्ये AQI च्या आकड्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

सफर संस्थेने यादरम्यान लोकांना काळजी घेण्याचा सल्ला जाहीर केला आहे ज्यात सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेरील कामे, कष्टाची कामे टाळणे आणि जॉगिंग ऐवजी थोडेसेच चालावे अशा गोष्टींचा समावेश होतो. मुंबईत श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता एक हेल्थ इमर्जन्सी झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने आता यावर तातडीने लक्ष देऊन पावले उचलण्याची गरज आहे.

यासाठी आम्ही पुढील मागण्या करत आहोत

1. मुंबई मधील सार्वजनिक आणि खाजगी बांधकाम प्रकल्पांना धूळ कमी करण्यासाठीच्या नियमांचे काटेकोरपालन करणे बंधनकारक करावे

2. सर्व नागरिकांसाठी आरोग्यसल्ला जाहीर करावा.

Sources :

[1] Road dust makes up 2/3rds of particles in Mumbai Air - The Times of India

[2] Air Quality Worsens AQI - Free Press Journal

[3] MPCB Warnings Unnoticed - Free Press Journal 

[4] Respiratory Disorders On The Rise - Mid Day 

72,517 of 100,000 signatures

मुंबईची हवा प्रदूषणमुक्त करण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. या मोहिमेला जास्तीत जास्त मुंबईकरांनी पाठिंबा दिल्यास आम्ही आमच्या मागण्या ठोसपणे महानगरपालिकेसमोर मांडू शकतो. आम्हाला ही पेटिशन जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

धन्यवाद,
झटका डॉट ऑर्ग

----------------------------------------------

Do consider making a donation to Jhatkaa.org to support our platforms.