Please Wait....

प्रति, 

१) शेखर सिंग, महापालिका आयुक्त (वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

२) श्री. अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (रस्ते), पुणे महानगरपालिका, रस्ते विभाग,

३) श्री. अशोक घोरपडे, सदस्य सचिव वृक्ष प्राधिकरण विभाग

मागण्या :

  • केवळ सुशोभीकरणासाठी कृत्रिम झाडांचा वापर करणे ताबडतोब थांबवा. 

  • औंध आणि वाकड रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तोडलेल्या झाडांची नुकसान भरपाई करावी. त्यासाठी उपाययोजना म्हणून त्वरित नवीन वृक्षलागवड सुरू करावी. 

  • कृत्रिम झाडे काढून खरी झाडे लावावीत.

गेल्या  काही वर्षापासून सतत वाढणारे तापमान आणि नष्ट होत चाललेली हिरवळ हा केवळ योगायोग नव्हे तर हे खरेखुरे परिणाम आहेत असे अनेक पर्यावरणप्रेमींचे मत आहे. पुण्याच्या यावर्षीच्या तापमानाची पातळी पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी याबद्दल सतत सतर्क केले जात आहे. राज्यात उष्णतेची लाट सुरू असतांना औंध-वाकड रस्त्यावर झाडे तोडली जात आहेत. या झाडांच्या जागी स्टीलची झाडे उभी केली जात आहे. आणि सुशोभीकरण म्हणून मिरवलं जात आहे. हे पाहून पुणेकर नागरिकही संतप्त झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वी औंध-वाकड रस्त्याच्या कडेला झाडांचा मनोरा असलेले बांधकाम बघितल्यावर पुणेकरांना धक्काच बसला. पायथ्याभोवती एक टन काँक्रीट टाकून स्टीलची कृत्रिम झाडे उभी करण्यात आली. ही झाडे खरं तर काढूनही टाकता येतील परंतु त्त्यांच्या पायथ्याशी केलेले काँक्रिटीकरण मोठा अडथळा आणू शकते.

गेल्या अनेक दिवसापासून पुण्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या कामादरम्यान अनेक भागात झाडे तोडली गेली. यावरून पुण्यातील नागरिकांनी झाडांची कत्तल थांबावी म्हणून पुणे महानगरपालिकेकडे मागण्या केल्या. नागरिकांचा हा लढा सुरूच होता त्यात पुन्हा ही नवीन भर महापालिकेने घातली आहे. पुण्यातील महापालिकेने अशी कृत्रिम झाडे बसवण्याची ही पहिलीच घटना नाही. 2023 मध्येसुध्दा  पीएमसीवर टिका झाली होती. जेव्हा त्यांनी शहरात होणाऱ्या G20 बैठकीत अशा झाडांवर 25 लाख रुपये खर्च केले होते.

विकासाच्या प्रवाहात पर्यावरणाशी खेळ होतोय यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विकासासाठी पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागणार म्हणून शोक व्यक्त केला जात आहे. 

शहरात गेल्या वर्षभरात रुंदीकरणासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापली गेली आहेत. त्यात अनेक झाडे कित्येक वर्ष जुनी होती. झाडे नैसर्गिक आणि शुध्द हवा देण्याचे कार्य करतात. वातावरणातील हानिकारक असलेले प्रदूषकं  शोषून ऑक्सीजन सोडतात. तसेच सावली देऊन आजूबाजूचे वातावरण थंड करून शहराच्या वातावरणातील उष्णता कमी करतात. सौंदर्यासाठी कृत्रिम झाडे लावणे व्यर्थ तर आहेच पण, ते नैसर्गिक झाडांच्या वाढीसाठीसुध्दा धोक्याचे आहेत. पुण्यातील वाढती उष्णता आणि दमट हवामान बघता एवढ्या निर्दयीपणे जुन्या झाडांची कत्तल करणे केवळ वर्तमान परिस्थितिसाठीच नाही तर भविष्यकाळासाठी सुध्दा धोक्याचे आहे.

आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आवाहन करत आहोत की औंध-वाकड रस्त्यालगत आणि शहराच्या इतर भागात झाडे तोडण्यात येत आहेत ते ताबडतोब थांबवावे. आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड करून हिरवळीला आणि जैवविविधतेच्या संवर्धनाला प्राधान्य देणारे शहर करावे. शहरी विकास हा शाश्वत विकास असावा. 

आपण या स्टीलसारख्या तांत्रिक सुशोभीकरणापेक्षा आपल्या शहरांची हिरवळ जपली पाहिजे. तेच आपल्या भविष्यासाठी बहुमोलाचे ठरेल!

6,640 of 10,000 signatures