Please Wait....

Campaign created by
अंजनेरी वाचवा कृती समिती

मुळेगावापासून अंजनेरी माथ्यापर्यंत प्रस्तावित रस्त्याच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
Stay on the work order of the proposed road from Mulegaon to Anjeneri hilltop.

अंजनेरी - नाशिकच्या जैवविविधतेच्या वैभवाचं एक जिवंत हिरवं उदाहरण. जानेवारी 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने अंजनेरी टेकडीला संवर्धन राखीव घोषित केले. यामागचा उद्देश होता अंजनेरी पर्वतावर आढळणाऱ्या डोंगराच्या कपारींमध्ये घरटी करणाऱ्या गिधाडांसोबतच १०५ पक्ष्यांच्या प्रजातींचं, लालमुखी माकड आणि वाघाटी सारख्या दुर्मिळ वन्यजीवांसोबतच कंदीलपुष्प सारख्या दुर्मिळ फुलांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं. याचा चांगला परिणाम मागच्या तीन वर्षात पहायला मिळाला. वनविभागाने स्थानिकांना हाताशी घेऊन कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, शिकारबंदीची प्रभावी अंबलबजावणी या तीन वर्षात केली. ग्रामस्थांना एकत्र करून संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करून वनसंवर्धनावर जोर देण्यात आला. गेल्या तीन वर्षात येथे एकही वणवा पेटला नाही हि त्याच नियोजनाची फलश्रुती.

पण याच अंजनेरीवर आता पायथ्याच्या मुळेगावातून थेट माथ्यापर्यंत १४ किलोमीटरचा रस्ता नेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठवला आहे.टेकडीच्या माथ्यावर मानवी वस्ती नाही त्यामुळे स्थानिक जनतेला या रस्त्याचा फायदा नाही. या रस्त्याचा उद्देश पर्यटनविकास असा सांगितला जात आहे. पण यातून होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे डोंगरावर आढळणाऱ्या जैवविविधतेला आणि पर्यावरणाला अपरिमित हानी पोहोचू शकते.

पर्यटन ही एक व्यापक घटना आहे ज्यामुळे प्लास्टिक प्रदूषण, जंगलातील आग, वनस्पती पायाखाली तुडवणे आणि संवेदनशील प्रजातींचा माहिती / संग्रह यासारखे धोके निर्माण होतात.  2015-16 मध्ये अंदाजे दीड लाख लोकांनी अंजनेरीला भेट दिली होती आणि दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे.

रस्ता बांधकाम विशेषत: घाट रस्ता हा अतिशय संवेदनशील अधिवास नष्ट करील आणि यामुळे विशेष वनस्पती आणि प्राणी धोक्यात येतील. रस्ता बांधकाम, स्फोटक वापर इत्यादींमुळे गिधाडे घरट्यांसह बऱ्याच प्रजाती ज्या अंजनेरी कडांवर रहातात त्यांच्यावर थेट परिणाम होईल. रस्ता बांधणीसाठी जंगल मोठ्या प्रमाणावर तोडली जाईल  (अंदाजे 12-15 हेक्टर जो अंजनेरी संवर्धन क्षेत्राच्या 15% आहे). भूजल वर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. या बदलांमुळे जमिनीखाली आढळणारे पाणी नष्ट होण्याचा धोका आहे. अंजनेरीचे कडे व त्याचे पठार हे स्थानिक समाज व जैवविविधतेसाठी अतिशय महत्वाचे अधिवास आहे. या रस्त्याच्या माध्यमातून या दोन्ही अधिवासांचे न भूतो न भविष्यती नुकसान होणार आहे. या पठारावर वाहनांच्या प्रवेशाचा परिणाम हा थेट टेकडीवरील चारा उपलब्धतेवर होईल आणि पठारावर जंगलातील आगीची शक्यता सुद्धा वाढू शकते.

या सर्व संभाव्य धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन, या रस्त्याच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.

Anjaneri is a living example of the rich biodiversity Nashik has been gifted with. Anjaneri cliffs support one of the largest colonies of critically endangered and Schedule I species - Long-billed Vulture in the state. The latest bird diversity records show more than 105 bird species in the area, in addition to 385 flowering plants (from 68 families) of which 114 are native to the region. 

But Anjaneri is now under threat!

The Public Works Department has submitted a proposal to construct a 14km road from Mulegaon to the top of the hill. There is no human settlement on the hilltop so the road is not useful for locals. PWD states the road will be useful for tourism development in the region. However, increased human activity can have a severe impact on the biodiversity of the Anjaneri Biodiv Reserve.

For the road project, forest cover will be cleared significantly (approximately 12-15 Ha which is 15% of the Anjaneri Conservation Reserve Area). Watershed will be severely destroyed due to topographic changes affecting groundwater recharge. Anjaneri Plateaus are a source of fodder for local villagers. Vehicular access to these plateaus will severely affect the fodder availability on the hill and increase the chances of forest fires on the plateaus. 

Besides, tourism can bring larger underlying threats like plastic pollution, forest fires, severe trampling and extinction of sensitive species. Nearly 1.5 lakh people visited Anjaneri in 2015-16 and this number is increasing leaps and bounds every year.

At a time when our ecosystems are under increasing threat, and climate change is a dangerous reality, we need to preserve what we have. Anjaneri is a precious resource and we cannot let it be destroyed for such “development”

14,823 of 20,000 signatures