Please Wait....

प्रति,

1. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

2. मा. पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य

3. मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य.

महाराष्ट्रात नगर, नाशिक, आणि कोल्हापूर  जिल्ह्यात असणाऱ्या पाणलोट क्षेत्रामुळे आणि संरक्षित वनक्षेत्रांमुळे इथे पावसाळ्यापूर्वी काजव्यांच्या पैदासीला पूरक वातावरण असते. मात्र गेल्या काही वर्षात काजवे पाहायला मिळतात म्हणून पर्यटकांची गर्दी इकडे वाढू लागली आणि "काजवा महोत्सवांना" सुरुवात झाल्याचे दिसते.

दरवर्षी मे ते जूनच्या दरम्यान काजव्यांचा मिलनाचा कालावधी असतो. मिलनानंतर नर काही दिवसात मरून जातो तसंच मादी जमिनीखाली अंडी घालते आणि तीही मरून जाते. याच प्रजनन प्रक्रियेचा भाग म्हणून काजवे लुकलुकतात. मात्र हजारो पर्यटक गाड्या आणि टॉर्चसह रात्री अभयारण्ये आणि वनक्षेत्रात जाऊ लागल्याने काजव्यांच्या या निसर्गक्रमात व्यत्यय तयार होतो. यावर्षी काजवा महोत्सवाला आलेला ऊत पाहता, पर्यावरणाच्या या बाजारीकरणामुळे येत्या काळात काजवे शिल्लक तरी राहतील का? असा मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात भंडारदरा अभयारण्यात जे घडले ते अतिशय नामुष्कीची आहे. हजारोच्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली, मोठया संख्यने आलेल्या वाहनांच्या उजेडामुळे काजव्यांनी पळ काढला. [1]

नाशिक वन-वन्यजीव विभागाने घालून दिलेले नियम पर्यटकांनी धाब्यावर बसवल्याने चित्र दिसून आले. [2] झाडाजवळ जाणं, फोटोसाठी झाड हलवणं, झाडावर दगड मारणं, मद्यपान करून गोंधळ घालणं अशा घटना इथे घडत आहेत. वनविभागाच्या नियमानुसार रात्री 9 नंतर कुणालाही अभयारण्यात प्रवेश नसतो, मात्र काजवा महोत्सव हा रात्री उशिरा घडतो त्यामुळे यावरही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते. वनविभाग नियमांच्या अंमलबजावणीसाठी कमी पडत आहे.

भंडारदरा अभयारण्यात १३० हुन अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, आणि  ८१६ वन्यप्राणी असून काजवा महोत्सवामुळे केवळ काजवेच नव्हे तर या प्राण्यांचे निसर्गक्रमालाही धक्का पोहचत आहे. [3] 

वन्यजीव अधिवासात माणसांचे येणे जाणे इतक्या प्रचंड संख्येने वाढले तर हळूहळू उरलासुरला अधिवास पण टिकणार नाही. मानवाने वेळीच आपल्या आकांक्षा आणि हाव आवरली नाही तर हि जैवविविधता संपुष्टात येईल अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

काजव्यांचा लुकलुकण्याचा काळ हाच प्रजननाचा काळ असल्याने त्यात केला जाणारा व्यत्यय वेळीच थांबला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात या आपल्या हलगर्जीपणामुळे काजवे कायमचे नाहीसे होतील. 

म्हणूनच या महोत्सवांना मिळणारी परवानगी रद्द करण्यात यावी आणि अभयारण्यात, वनक्षेत्रात अशा मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

संदर्भ:

  1. काजवा महोत्सवच आता काजव्यांच्या मुळावर उठलाय का? - BBC News मराठी

  2. Ahmednagar News : पर्यटकांच्या झुंबडीमुळे काजवा महोत्सवावर परिणाम ! अनेकांचा झाला हिरमोड

  3. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वन्य प्राणी व पक्षांची गणना 

2,442 of 5,000 signatures