कोकण किनारपट्टीवरील राजापूर तालुक्यातील बारसू पंचक्रोशीत खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे रिफायनरी प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रदेशातीळ जैवविविधतेला प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. २०१५ साली हाच प्रकल्प नाणार येथे प्रस्तावित होता. पण स्थानिकांच्या जोरदार विरोधमुळे त्यावर स्थगिती आली आणि त्याची जागा बदलण्यात आली.
बारसू - सोलगाव भागातील शेकडो नागरिक या प्रकल्पाला विरोध करत निदर्शने करत आहेत. कारण त्यांना कोकणच्या निर्सार्गाची, जैवविविधतेची चिंता वाटत आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविका या प्रकल्पामुळे धोक्यात येऊ शकतात अशी चिंता नागरिकांना वाटते.
प्रस्तावित प्रकल्पाची जागा आणि एकूणच कोकण किनारपट्टी हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन आहे. तसेच या प्रकल्पासाठी ६२०० एकर जमीन संपादित करायची आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रकल्पाला जमीन दिली तर पारंपरिक व्यवसाय, आंबा आणि काजूच्या बागा, शेती आणि पर्यावरणाचं काय होणार हा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.
आधीच कोकणात औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे वायू प्रदूषणाला लोक तोंड देत आहेत. रिफायनरीमुळे उद्भवणाऱ्या रासायनिक उत्सर्जनामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढण्याचा धोका देखील स्थानिकांना सतावत आहे.
एकदा हा प्रकल्प सुरु झाला तर काही वर्षात झपाट्याने आंबा, काजूच्या बागा आणि इतर शेतीला प्रदूषणाचा फटका बसू लागेल. आमचा विरोध हा कोकणाच्या निर्सार्गाला होत असलेल्या हानीला आहे आणि कोकणकिनारपट्टीचा होणार ऱ्हास टाळण्यासाठी हा विरोध आहे. अनेक शेतकऱ्यांना जमीन प्रकल्पाला दिली तर उपजीविकेचं काय हा प्रश्न सतावत आहे.
रिफायनरी म्हणजे प्रदूषण आणि प्रदूषण म्हणजे रिफायनरी हे साधे सरळ समीकरण आहे. पण त्याला ग्रीन रिफायनरी नाव देऊन लोकांची दिशाभूल होत आहे. यातून निघणारे सांडपाणी, वायू, टाकाऊ पदार्थ कसे ग्रीन असतील? असा प्रश्न कोकणवासी विचारत आहेत.
हा फक्त राजपुरचा प्रश्न नाही, तर समुद्र, खाड्या यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन कोकणावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या संपन्न निसर्गसौंदर्यावर त्याचे खूप मोठे वाईट परिणाम होणार आहेत.
आपलं कोकण वाचवण्यासाठी या पेटिशन वर sign करा आणि मोहिमेला पाठिंबा द्या.