Please Wait....

प्रति, 

१) मा. आयुक्त, महानगरपालिका नाशिक 

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, नाशिक 

३) प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र  

४) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय 

मागण्या

  • नांदुरमधमेश्वर पाणथळावरचे प्रदूषण थांबविण्यासाठी व तिथल्या जैवविविधतेच्या सुरक्षेविषयी तात्काळ बैठक घ्यावी. 

  • गोदावरी पात्रात झालेल्या पानवेली काढण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांद्वारे तात्काळ स्वच्छता करण्यात यावी. 

  • नदीत औद्योगिक क्षेत्रांचे आणि गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई  करावी.

  • पानवेली पसरलेल्या शहराच्या आणि नदीलगत असलेल्या इतर संपूर्ण भागांची पाहणी करून स्वच्छता करण्यात यावी. 

नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून उद्भवत आहे. परंतु हा प्रश्न केवळ नाशिक आणि गोदावरी पुरताच उरला नाहीये तर थेट महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावर घोषित केलेले नांदुरमधमेश्वर हे रामसर  टिकेल की नाही यावर येऊन ठेपलाय. नदीच्या दूषित पाण्यामुळे शहरात नदीच्या पात्र भरून ज्या पानवेली तयार होतांना दिसतात, त्या आता शहरापासून ३०-४० किमी अंतरापर्यंत पसरल्या आहे. 

महाराष्ट्रातील जागतिक दर्जा मिळालेल्या तीन रामसर वेटलँड पैकी एक रामसर वेटलँड हे नाशिक जिल्ह्यात येते. हे खरंतर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु या दूषित पाण्यामुळे येथे स्थलांतरित झालेले विदेशी जलचर यांचे देखील अस्तित्व धोक्यात आले आहे[१]

रामसर वेटलँड म्हणजे काय?

‘रामसर वेटलँड ’ म्हणजे पाणथळ जमीन जिथे अनेक जातीच्या जलचर आणि पशूपक्षांचा अधिवास असतो त्यात अनेक विदेशी प्रजाती सुद्धा स्थलांतरित होतात. २७ जानेवारी २०२० रोजी पार पाडलेल्या 'इंटरनॅशनल रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स' या अधिवेशनात भारत देशातील १० राज्यांसोबतच महाराष्ट्राच्या पदरात देखील एक रामसर वेटलँड मिळाले. नाशिक जिल्ह्यातील नांदुरमधमेश्वर या रामसर साईटला महाराष्ट्रातील पहिल्या रामसरचा साईटचा जागतिक दर्जा मिळाला. जैवविविधतेसाठी या पाणथळ प्रदेशात जलीय आणि स्थलीय वनस्पतींच्या ५३६ प्रजाती आहेत. [२] 

अशी अतिशय महत्वाची जागा मात्र आज आपण केलेल्या प्रदूषणामुळे धोक्यात आली आहे. नाशिक तालुक्यातून निफाडला पोहचेपर्यंत गोदावरीचे पाणी अतिशय दूषित झालेले असते. यामुळे नांदुरमधमेश्वर जलाशय आणि तिथल्या पक्षी अधिवासाला तीव्र धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच धरणातील अनेक मासे मरण पावल्याचे आढळले आहे. [३]

नदीच्या पात्रात सोडण्यात आलेले गटारी आणि कारखान्याचे पाणी यामुळे पाण्यात पानवेलींचे प्रमाण वाढले असून पाण्याचे BOD (Biological Oxygen Demand) कमी होते.. आणि जलचर प्राण्यांना पुरेसे ऑक्सीजन न मिळाल्याने ते मरण पावतात. नदीभर साम्राज्य पसरविणाऱ्या या पानवेली जलचर प्राण्यांसाठी प्रचंड घातक ठरत आहे.

यावर्षीच्या उन्हाळ्यातील परिस्थिती पाहता गावागावात पिण्याच्या पाण्याचे हाल दिसून येतात. अशावेळी पशू-पक्षीसुध्दा नदी, धरणाच्या पाण्यावरच पूर्णपणे अवलंबून असतात. गोदावरी नदी शहरापासून ज्या गावांना जाऊन मिळते ती गावे या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात. या केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतीवरसुध्दा परिणाम झाला आहे. त्यामुळे मातीची क्षमता खालावत आहे आणि आरोग्यावरदेखील त्याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थ म्हणत आहेत. [४]

एकीकडे गोदावरीला पवित्र स्थान देऊन आपण मिरवतो पण प्रत्यक्षात ती दूषित पाण्याने इतकी खराब झाली आहे की, देशभरातून येणारे भाविकसुध्दा या पाण्याला स्पर्श करतांना त्यांचा हात नाकावर जातो. गोदावरीच्या प्रश्नांवर अनेक संस्था काम करत आहेत. परंतु आज गोदावरीवर तयार झालेले रामसर वेटलँड टिकेल की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे. 

नाशिकचे सौंदर्य आणि अनेकांच्या गरजा भागविणारी आपली गोदामाईची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. गोदावरीचे सौंदर्य परत आणण्यासाठी व पानथळीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी गोदावरी प्रदूषणावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन करत आहोत. पेटीशनवर सही करून हा प्रश्न सोडविण्यासाठी मोहिमेला पाठिंबा द्या.

संदर्भ- 

१) नाशिकच्या दूषित पाण्याने पक्षांचा अधिवास धोक्यात; नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात मृत मासे

२)  जलप्रदुषणामुळे ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात; वाढत्या जल प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

३) Nandur Madhmeshwar wetland becomes Maharashtra’s first Ramsar sites | India News - The Indian Express

 ४) प्रदुषणाच्या विळख्यात नाशिकची जीवनवाहिनी गोदावरी नदी, आरोग्यासह शेतीही धोक्यात

५) Thousands of Fish Die in Nandur Madhyameshwar Dam Amid Water Crisis

416 of 1,000 signatures