Please Wait....

प्रति,
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्य
आदित्य ठाकरे - पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य

२०२१ च्या मे महिन्यात ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी घरघर सुरु झाली. ब्रम्हगिरीवरील सुपलीची मेट गावाच्या डोंगराच्या खालच्या बाजूने खाजगी विकसकाकडून स्फोट करून जमीन समतल करण्याचा घाट सुरु होता. गावकऱ्यांनी भूस्खलन होऊन माळीण सारखी दुर्घटना होण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाला बोलून दाखवली. पत्रव्यवहार केले पण स्फोट घडतच राहिले आणि ब्रम्हगिरी पर्वताचा एक मोठा भाग खोदून काढला गेला. पुढे महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने सुरु केलेल्या जनजागृतीने आणि नाशिक जिल्हयातील पर्यावरण प्रेमींनी स्थापन केलेल्या ब्रम्हगिरी वाचवा कृती समितीच्या पुढाकाराने या विषयाला वाचा फोडली गेली. अथक प्रयत्नांनी ब्रम्हगिरीवरील खोदकाम थांबले, पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

पण अशाप्रकारे खोदकाम होणार ब्रम्हगिरी हा एकच पर्वत नाही. गेल्या महिनाभरातच सह्याद्री पर्वतरांगेतील संतोषा, भागडी आणि इतर अनेक डोंगरांवर अशी घरघर दिवसरात्र सुरु असलेली बाहेर आले आहे. काही ठिकाणी गौणखनिजासाठी, काही ठिकाणी फार्म हाऊसेस तर काही ठिकाणी उद्योगांसाठी सर्रास सह्याद्री पर्वत फोडला जात आहे. यामुळे सह्याद्रीत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा किंवा भूस्खलनाचा धोका आहे.

सह्याद्री पर्वतरांगेतील म्हणजेच पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या पर्वतरांगांमध्ये ३२५ जागतिक पातळीवर धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत. यात २२९ वनस्पती प्रजाती, ३१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, १५ पक्ष्यांच्या प्रजाती, ४३ उभयचर प्रजाती, ५ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत आणि १ माशाची प्रजात आहे. याशिवाय संपूर्ण सहयाद्री पर्वत रांगेत अनेक किल्ले आहेत ज्यांना ऐतिहासिक दृष्ट्या फार मोठे महत्व आहे. अशावेळी या पर्वतरांगेचे, त्यावरील वनसंपदा आणि जैवविविधता जपण्याऐवजी सह्याद्रीच्या या वैभवाला सुरुंग लावून ओरबाडण्याचेच काम सुरू आहे.

महाराष्ट्राच्या या अतिमहत्वाच्या पर्वतरांगेला खोदकाम, खाणकाम, अनियमित बांधकाम थांबवण्यासाठी आम्ही खालील मागण्या करत आहोत.
१. सह्याद्रीतील सुरु असलेले खोदकाम, खाणकाम, बांधकाम त्वरित बंद व्हावेत.
२. अवैधरित्या सुरु असलेल्या जागांना संबंधित अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी भेट देऊन चौकशीचे आदेश द्यावेत आणि दोषींवर त्वरित कडक कारवाई व्हावी.
३. सहयाद्री पर्वतरांगेचे सीमांकन करावे.

-- ब्रम्हगिरी कृती समिती

13,306 of 20,000 signatures

सह्याद्री वाचवा अभियानाला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद.

जितक्या जास्त प्रमाणात हि पेटिशन sign आणि share केली जाईल तितकाच जास्त प्रतिसाद आम्हाला प्रशासनाकडून मिळवता येईल. कृपया खालील बटणांवर क्लिक करून ही पेटिशन आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत share करावी.

-- झटका टीम