प्रति,
आयुक्त,
पुणे महानगरपालिका.
मागण्या:-
बेकायदेशीर कचरा जळणाऱ्यांवर कारवाई करून जाळपोळीच्या घटनांना आळा घालणे.
जाळपोळीच्या तक्रारींसाठी २४ तास हेल्पलाईन नंबर सुरु करा.
NGT ला दिलेल्या ऍक्शन प्लॅन नुसार कचरा जाळण्यास प्रतिबंध घालण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांचा मासिक आढावा घेणे आणि पुणे महानगरपालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करणे.
सदर कामासाठी नेमलेल्या भरारी पथकाची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे.
कचरा जाळण्याच्या घटना रात्री किंवा पहाटेच्या वेळात घडत असल्याने या वेळी योग्य ते देखरेख आणि कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभी करणे.
अपडेट: २८ ऑक्टोबर २०२४
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम, यांची भेट घेऊन पुण्यातील कचरा जाळपोळीच्या वाढत्या घटनांविषयी पुण्यातील नागरिकांची तक्रार आणि काळजी मांडली. महापालिका प्रशासन या प्रश्नावर उपाययोजना करत आहे, आणि कचऱ्याचे संकलन सुधारण्यासाठी नवीन वाहने आणि पायाभूत सुविधा आणणार असे आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे कचरा जाळण्याच्या घटना समोर आल्या. बाणेर, बालेवाडी, वाघोली, नदीकाठच्या अनेक ठिकाणी कचरा जाळण्यासंबंधित तक्रारी नोंदवल्या गेल्या. मात्र यावर कोणतीही कारवाई पुणे महानगरपालिके कडून होत नाही असे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
कचरा जाळण्याने शहराची हवा अधिकच दूषित आणि विषारी होत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. कचऱ्यातून उत्सर्जित होणारे विषारी वायू, सल्फर, कार्बन मोनॉक्साईड, फॉस्फरस यांमुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. वृद्ध, लहानमुले यांना याचा सर्वाधिक धोका असतो. सध्या शहरात श्वसनाचे आजार वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या कचऱ्याच्या धुराचे प्रमाण वाढत राहिले तर कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका संभवतो.
म्हणूनच यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय हरित लवादा (NGT) च्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने ६ महिन्यांपूर्वी कचरा जाळपोळ व्यवस्थापन कृती आराखडा जाहीर केला आहे. मात्र त्यात दिलेल्या तरतुदीनुसार आजवर एकही मासिक रिपोर्ट महापालिकेने उपलब्ध केलेला नाही.
या आराखड्यात जाळपोळीच्या घटनांवर जागीच कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र या पथकाची कोणतीही माहिती, संपर्क क्रमांक इत्यादी पालिकेच्या वेबसाईट वर उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नाही.
NGT ला दिलेल्या खुलाशात जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पालिकेकडे ४४ कचरा जाळपोळीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. महानगरपालिकेने सादर केलेल्या माहितीनुसार शहरात ९२८ कचऱ्याच्या जागा chronic स्पॉट्स ठरल्या आहेत. जिथे सतत मोठ्याप्रमाणात कचरा फेकला आणि जाळला जातो. यापैकी ७०० जागा सुधारण्यात पालिकेला यश आल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती तशी दिसत नाही.
कचरा जाळण्याच्या घटना जास्तकरून रात्री अपरात्री किंवा पहाटे घडत असल्याने यावेळी जागांवर लक्ष ठेवण्याची आणि कारवाई करण्यासाठी व्यवस्था तयार करण्याची खरी गरज आहे. तसेच कचरा व्यवस्थापनाच्या कामाचा मासिक अहवाल पालिकेने वेळोवेळी सादर केला तर उरलेल्या त्रुटी भरून काढणे सोपे होऊ शकते.
Sources:
Pune News: Garbage Burning Near NH-48 Causes Smoke and Air Quality Concerns
Pune: Wakad-Chandani Chowk Service Road Turning a Garbage Dump, Civic Concerns Intensify
Pune Goes Up in Smoke: Garbage Burning Leaves Residents Gasping
https://twitter.com/pulse_pune/status/1844290581029076997/photo/1
On NGT order Pune Municipal Corporation uploads garbage burning action plan, but no monthly report
Pune's Garbage Burning Crisis: A Major Threat to Air Quality | Pune News - Times of India