Please Wait....

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र  

२. मा. आयुक्त महानगरपालिका, पिंपरी चिंचवड

३. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र 

मागण्या:

  1. सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम तात्काळ सुरू करावे.

  2. इंद्रायणी नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर दंड ठोठावण्यात यावा. 

  3. पुर परिस्थिती निर्माण करणारे नदी सुधार प्रकल्प बंद करा. 

इंद्रायणी ही महाराष्ट्रातील अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्वाची आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली नदी आहे. गेल्या आठवडयापासून या नदीतीतील केमिकलचे प्रमाण इतके वाढले की इंद्रायणी पूर्णपणे फेसाळून गेल्याचे दिसले. यावरून पाणी किती प्रदूषित आणि केमिकलयुक्त आहे याचा अंदाज सहज येऊ शकतो. 

या सगळ्याला MIDC आणि काठावरील अनेक गावातून नदीत सोडले जाणारे सांडपाणी कारणीभूत आहे. याचे एक जिवंत चित्र चाकण MIDC क्षेत्राच्या बाहेर दिसून येत आहे. येथे अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. तेथून ११ नाले इंद्रायणी नदीत मिळतात. हे सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे आणि MPCB च्या सर्व नियमांना धाब्यावर बसवल्याचे दिसते. [1]

नोव्हेंबर २०२३ मध्ये सुध्दा इंद्रायणीवर विषारी फेसाचा थर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या बैठका झाल्या. इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी लवकरात लवकर आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री दिपक केसरकर यांनी दिले होते. [2] परंतु गेल्या वर्षी किंवा त्यापूर्वी केलेल्या नियोजनांचा इंद्रायणीची आजची परिस्थिती पाहता अद्यापही काही परिणाम दिसून येत नाही.

पीएमआरडीएने (Pune Metropolitan Region Development Authority) इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार नदीकाठी २३ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार होते. परंतु त्या संदर्भातील सुध्दा अद्याप एकही काम पूर्ण झालेले नाही. [3] 

त्याचबरोबर नदीतील प्रदूषणावर उपाययोजनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथे प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी-Effluent treatment plant) कार्यान्वित केला होता त्याचे काय झाले यावरसुध्दा मोठा प्रश्न उभा राहत आहे.

ऐतिहासिक परंपरेनुसार दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातील विविध भागातून लाखो संख्येने लोक देहू, आळंदीची वारी करतात. वारीला आल्यानंतर या नदीच्या पाण्यात स्नान व ते पाणी तीर्थ म्हणून पितात. नदी प्रदूषित झाल्यानंतर लोकांना या पाण्यात स्नान न करण्याचे व हे पाणी न पिण्याचे आवाहन केले आहे. 

तरीदेखील ६०-७० टक्के भाविक या पाण्यात स्नान करतात. पाण्याच्या अशुद्धतेची प्रमाण इतकं आहे की, या पाण्याने अनेकांना त्वचेचे आजार उद्भवत आहेत. प्रशासनाकडे वारंवार विणवण्या करून सुध्दा शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून अनेक वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. [4]

सध्या पिंपरी महापालिका ते लोणावळा दरम्यानच्या नगरपरिषद आणि ग्रामपंचयातीमुळे प्रदूषण वाढत आहे असा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण महामंडळ मांडत आहे. या भागातील शासकीय कार्यालयांनी अजूनही एसपीटी प्लांट केले नसल्याने आणि दूषित पाणी सोडल्याने इंद्रायणीची अवस्था अशी झाली आहे. MPCB नी या कार्यालयांना नोटिस पाठविल्याचे सांगितले आहे. परंतू केवळ नोटीसी धाडण्यात धन्यता न मानता या शासकीय कार्यालयांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.[5]

इंद्रायणी लवकरात लवकर प्रदूषण मुक्त व्हावी आणि तिचे पावित्र्य जपले जावे यासाठी प्रशासनाला आवाहन करत आहोत. 

संदर्भ- 

  1. माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात; नदीतील पाण्यावर तवंग, वारकऱ्यांमध्ये नाराजी 

  2. Blame game continues over Indrayani river pollution - Hindustan Times

  3. PMRDA Plans 23 Sewage Treatment Plants for Indrayani River Rejuvenation Project - Times of India

  4. Ahead Of Wari, Foam In Indrayani Raises Concerns | Pune News - Times of India

  5. माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात! वारकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा चेहरा समोर, पिंपरी पालिका ते लोणावळा दरम्यानच्या ग्रामपंचायती दोषी

1,231 of 2,000 signatures