Decision makers:
मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.
मा. माधुरी मिसाळ, परिवहन राज्यमंत्री
मा. संजय सेठी , भा. प्र. से. अपर मुख्य सचिव (परिवहन) & अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.
Demands:
स्थानक परिसरात लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे यांची संख्या वाढविण्यात यावी.
बस स्थानकात मुंबई लोकलच्या धरतीवर रात्री 9 नंतर पोलीस सुरक्षा वाढवण्यात यावी.
महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग रूम तयार करावेत आणि बंद असलेले हिरकणी कक्ष सुव्यवस्थित करून खुले करावेत.
आगारात असणाऱ्या मुक्कामी बसेसची वेळोवेळी तपासणी व्हावी.
महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर पहाटे एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकातून, अनेक शहरांसाठी गाड्या जातात. या स्थानकातून दररोज सुमारे २१०० बस ये - जा करतात आणि दररोज १ लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही ही जागा महिलांसाठी सुरक्षित नाही हेच परवाच्या प्रकरणातून स्पष्ट होतं.
पुण्यासारख्या मोठ्ठया आणि रात्रीही वर्दळ असणाऱ्या शहरात अशी घटना घडते तर कोल्हापूर, नाशिक, सातारा, नागपूर अशा इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल? मुक्कामाच्या बस, खराब झालेल्या वर्षानुवर्षे धुळखात पडलेल्या बसेसमुळे असुरक्षित परिसर, रात्रीच्यावेळी सुरक्षा रक्षक नसल्याने प्रवास करण्याची भिती, हे प्रश्न सगळीकडे सारखेच आहेत. दरवेळी आपण अशा घटना घडल्यानंतरच जागे व्हायचे का?
प्रवास करताना महिला प्रवाशांना नेहमीच असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागतो. जितका महिला प्रवाशांना त्रास होतो तेवढाच बस स्थानकातील महिला कर्मचाऱ्यांनाही असुरक्षित वातावरणाचा त्रास होतो. अनेक महिला कर्मचारी रात्रीची ड्युटी टाळतात. महिला रात्रीचा प्रवास करताना झोपत नाहीत. बस स्थानकात चोर किंवा मद्यपान करणाऱ्या पुरुषांचा वावर असल्याने अत्याचार होण्याची भिती सतत जाणवते. मोठ्या शहरात स्थानकात पोलीस यंत्रणा असली तरी ती अपुरी पडते आणि लहान शहरांमध्ये तर यंत्रणाही नसते. त्यामुळे अशाप्रसंगी मदत मिळणे कठीण होऊन बसते.
महाराष्ट्रातल्या बस स्थानकांवर महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग रूम नाहीत. काही ठिकाणी स्तनपानासाठी हिरकणी कक्ष बांधले गेले आहेत मात्र त्यांना कुलूप असते. अशा परिस्थितीत महिला सुरक्षेचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसते.
हा प्रश्न फक्त पुण्यापुरताच उरत नाही. महिला सुरक्षा हा प्रत्येक शहराचा प्रश्न आहे. पुण्यातील बसस्थानकांचा परिस्थितीचा आढावा घेतला जावाच. पण राज्यातील इतर शहरातील बसस्थानकांचीही तपासणी करून महिलांच्या सुरक्षेसाठी वरील सुविधा अंमलात आणाव्यात यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत.
Sources: